तू म्हणालीस

जरा थांबलो होतो मी कुठे
तू म्हणालीस थांबणे गैर येथे

जरा कुठे गळाली आसवे दोन माझी
तू म्हणालीस रडणे गैर इथे

मी होतो माझ्यात गुंतलेला
तू म्हणालीस एकटे चालणे गैर येथे

मी चुकलोच होतो अताशा
तू म्हणालीस मैत्रीच गैर येथे...

तुझ्या मैत्रीणे तारले असे...

तुझ्या मैत्रीस जर मूकलो असतो मी
वाट आयुष्याची चूकलो असतो मी

तुझ्या मैत्रीणे तारले असे... नाहीतर
वादळात या जीवनाच्या हूकलो असतो मी

खुलणार्‍या होत्याच बागा खुप जरी
मैत्रीवीणा तुझ्या ...निवडुंग सुकलो असतो मी

नशिबाचे फ़ासेच सारे खेळ खेळुन गेले
मृत्युसमोरही क्षणभर तुजसाठी झूकलो असतो मी
--संदीप सुरळे

आठवणी

आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्‍या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात

प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो

जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो

आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्‍या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्‍या

माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी

तुझी मैत्री....

तुझ्या माझ्यात प्रेम आहे
मित्र मैत्रीणीचं
जगाला सांगितलं ओरडुन
अजुन काय करायचं

तुझी मैत्री मी
अजुन जपतो
जग मला म्हणत असतं
तुझ्यात मी प्रेयसी बघतो

तुझ्यावीना मैत्रीचं विश्व
थोडं अधुरं वाटतं
तुझ्याचमुळे मैत्रीचं नातं
खरं खुरं वाटतं

खरं सांगतो आज तुला
तू नाहीयेस जरी साथ
तुझ्यावीनाही जाणवतो मला
खांद्यावर तुझ्या मैत्रीचा हात

कधि तू रडताना
डोळ्यांत माझ्या आसवं दाटायची
माझ्यासाठी नाही ढळला माझा अश्रु कधी
तुझ्यासाठी डोळ्यांत त्यांची गर्दी वाटायची

तुझी माझी मैत्री
नितळ निखळ झर्‍यासारखी
गंध तिचा पसरते
अन चालते फ़क्त मैत्रीसारखी

तुझी माझी मैत्री अशी
अल्लड्शा मुलासारखी
जगाला विसरून खुलणार्‍या
हळुवार फ़ुलासारखी

तुझ्याशीवाय या जगात
आपली मैत्री जपतो आहे
तू नाहीस जरी
माझ्या शब्दात तुला बघतो आहे

प्रवास

तुझ्यावीना ही होतो
तुझ्या सहवासाचा भास
तु नसली तरी
करतो तुझ्या मैत्रीत अखंड प्रवास

जगण्याचे उदास गाणे
प्रत्येक वाटेवर काळोख गात होता
आशेचा एक किरण फ़क्त
तुझ्या मैत्रीचा हात होता

माझ्या दु:खात
अश्रू होवुन ढळालीस तू
मी कुडकुडता थंडीत
माझ्यासाठी जळालीस तू

आता उदास गाणे
ओठी माझ्या उमटले
ते सूर मैत्रीचे
आज वेदना होवुन पेटले

तुझ्यावीना जगण्याचा
प्रयत्न रोज केला
प्रत्येक दिनी तुझ्या आठवांनी
उर अधिक भरुन आला

तू अन तुझी मैत्री...

तू अन तुझी मैत्री
जगण्याची एक वाट झाली होती
तुझ्याच मैत्रीमुळे
माझी अन आयुष्याची पुन्हा गाठ झाली होती

सारं जग फ़ितूर जेव्हा
तू मला आपलं मानलं होतसं
सार्‍या जगाचा मी जरी
फ़क्त तुच मन माझं जाणल होतसं

माझे अश्रू ढळताना
माझ्यासोबत तुझा साथ होता
मी कुठे होतो तेव्हा
तुला जेव्हा हवा माझा हात होता

'तू विसर मला'
बोलुन गेलीस तू जरी
तुझ्या मैत्रीत जगलो कधि
तुझ्याशिवाय आज तुझ्या आठवांची वाट बरी

जग विचारते मज
अशी रे कशी तुझी मैत्री?
सांगु कुणा कसे मी
होती कशी तुझी मैत्री

आठवणी

आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्‍या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात

प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो

जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो

आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्‍या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्‍या

माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी

मैत्रिण म्हणुन मागेल....

आता तुझं ते भेटणं नाही
दिलखुलास तुझं ते हसणं नाही
निरागस,नितळ वागणं तुझं मनात घर करुन गेलं
अन तुझं बोलणं कितीतरी आठवणी पेरुन गेलं

हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप...हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता

आठवतो तुला मी अधुन मधुन त्याचा राग नको मानुस
फ़क्त तुझ्या आठवणी आहेत..त्या तू परत नको मागुस

जगाला हसवत स्वत:चे अश्रू पिणारी तू
अळवावरच्या दवालाही तळहातावर घेणारी तू

तू माझं 'श्रद्धा'स्थान अन तुझी मैत्रि माझी 'श्रद्धा' होती
मी निवडुंग...पाहुन तुला...क्षणभर जगलो तू असं रानफ़ुल होती

आठवण तुझी आजही हळव्या मनास आहे...मग सांग मी कठोर कसा ठरलो
अगं...हे नखरे जीवनाचे, मैत्रित कधि मी न मागे सरलो

पुढच्या जन्मातही पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल
हा जन्म अपुरा पडला पुढच्या जन्मी पुन्हा तुझा मित्र होऊन जगेल

श्रद्धा

श्रद्धा म्हणजे भक्ति
श्रद्धा म्हणजे विरक्ती
श्रद्धा... एक दर्पण
श्रद्धा म्हणजे समर्पण
श्रद्धा एक भास?
श्रद्धा एक विश्वास
श्रद्धा...एक गहन चिंतन
श्रद्धा...विचारांच अविरत मंथन
सुरंगी उषःकाली आळवावा असा राग म्हणजे श्रद्धा
ग्रिष्मातही वसंत खुलवणारी बाग म्हणजे श्रद्धा
मनातुन उमटणारा आर्त सूर म्हणजे श्रद्धा
भावनांचा महापूर म्हणजे श्रद्धा
श्रद्धा म्हणजे मैत्रि
नितळ, निखळ प्रिती
श्रद्धा.. एक आठवण
श्रद्धा...मायेची साठवण
श्रद्धा म्हणजे वीज होऊन गरजणं
मायेच्या रुपानं हळुवार बरसणं
श्रद्धा...जगण्याची एक रित
श्रद्धा...आयुष्यावर केलेली नितांत प्रित
श्रद्धा.. एक तरल भाव
श्रद्धा... आयुष्याच्या रस्त्यावरचं मैत्रिचं गाव
श्रद्धा... काळजावर झालेला एक खोल घाव
श्रद्धा...अर्ध्यावरती मोडलेला एक मैत्रिचा डाव

तुझ्या मैत्रीचे क्षण....

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात