जरा थांबलो होतो मी कुठे
तू म्हणालीस थांबणे गैर येथे
जरा कुठे गळाली आसवे दोन माझी
तू म्हणालीस रडणे गैर इथे
मी होतो माझ्यात गुंतलेला
तू म्हणालीस एकटे चालणे गैर येथे
मी चुकलोच होतो अताशा
तू म्हणालीस मैत्रीच गैर येथे...
श्रद्धा...जी आजही माझी मैत्रीण आहे पण मी तीचा मित्र नाही... आयुष्यात चढ उतार येत असतात.अनेक चुका घडत असतात आपल्या हातून, आपण केलेल्या चुकीची आपल्याला माफ़ी मिळेलच असं नाही! मीही अशीच एक चुक केली जिला माफ़ी नाही.पण मला नाही विसरायची ती चुक! I DON'T WANT TO FORGET !!! म्हणुनच......