श्रद्धा

श्रद्धा म्हणजे भक्ति
श्रद्धा म्हणजे विरक्ती
श्रद्धा... एक दर्पण
श्रद्धा म्हणजे समर्पण
श्रद्धा एक भास?
श्रद्धा एक विश्वास
श्रद्धा...एक गहन चिंतन
श्रद्धा...विचारांच अविरत मंथन
सुरंगी उषःकाली आळवावा असा राग म्हणजे श्रद्धा
ग्रिष्मातही वसंत खुलवणारी बाग म्हणजे श्रद्धा
मनातुन उमटणारा आर्त सूर म्हणजे श्रद्धा
भावनांचा महापूर म्हणजे श्रद्धा
श्रद्धा म्हणजे मैत्रि
नितळ, निखळ प्रिती
श्रद्धा.. एक आठवण
श्रद्धा...मायेची साठवण
श्रद्धा म्हणजे वीज होऊन गरजणं
मायेच्या रुपानं हळुवार बरसणं
श्रद्धा...जगण्याची एक रित
श्रद्धा...आयुष्यावर केलेली नितांत प्रित
श्रद्धा.. एक तरल भाव
श्रद्धा... आयुष्याच्या रस्त्यावरचं मैत्रिचं गाव
श्रद्धा... काळजावर झालेला एक खोल घाव
श्रद्धा...अर्ध्यावरती मोडलेला एक मैत्रिचा डाव