तुझी मैत्री....

तुझ्या माझ्यात प्रेम आहे
मित्र मैत्रीणीचं
जगाला सांगितलं ओरडुन
अजुन काय करायचं

तुझी मैत्री मी
अजुन जपतो
जग मला म्हणत असतं
तुझ्यात मी प्रेयसी बघतो

तुझ्यावीना मैत्रीचं विश्व
थोडं अधुरं वाटतं
तुझ्याचमुळे मैत्रीचं नातं
खरं खुरं वाटतं

खरं सांगतो आज तुला
तू नाहीयेस जरी साथ
तुझ्यावीनाही जाणवतो मला
खांद्यावर तुझ्या मैत्रीचा हात

कधि तू रडताना
डोळ्यांत माझ्या आसवं दाटायची
माझ्यासाठी नाही ढळला माझा अश्रु कधी
तुझ्यासाठी डोळ्यांत त्यांची गर्दी वाटायची

तुझी माझी मैत्री
नितळ निखळ झर्‍यासारखी
गंध तिचा पसरते
अन चालते फ़क्त मैत्रीसारखी

तुझी माझी मैत्री अशी
अल्लड्शा मुलासारखी
जगाला विसरून खुलणार्‍या
हळुवार फ़ुलासारखी

तुझ्याशीवाय या जगात
आपली मैत्री जपतो आहे
तू नाहीस जरी
माझ्या शब्दात तुला बघतो आहे