तुझ्या मैत्रीचा गाव

शेवटचं बोलणं कधि शेवटचं असावं असं वाटतं का गं?
कितीही पुसले डोळे तरी डोळ्यातलं पाणी कधि आटतं कागं?

हुंदका गळ्यात अडकलेला ...मलाच मी हसवावं कसं?
आयुष्यच फ़सलं...मला मी फ़सवावं कसं?

आपल्या मैत्रीचं फ़ुल कोमेजलं ऐन सकाळी
आता सांभाळतो त्या फ़ुलाची प्रत्येक पाकळी

मी अभागी...अभागीच राहणार आहे
आयुष्याचा हा खेळ असाच पाहणार आहे

तुझ्या मैत्रीचा गाव थोडा भावला होता
तुझ्या गावातच देव थोडाफ़ार पावला होता

तू म्हणालीस

जरा थांबलो होतो मी कुठे
तू म्हणालीस थांबणे गैर येथे

जरा कुठे गळाली आसवे दोन माझी
तू म्हणालीस रडणे गैर इथे

मी होतो माझ्यात गुंतलेला
तू म्हणालीस एकटे चालणे गैर येथे

मी चुकलोच होतो अताशा
तू म्हणालीस मैत्रीच गैर येथे...

तुझ्या मैत्रीणे तारले असे...

तुझ्या मैत्रीस जर मूकलो असतो मी
वाट आयुष्याची चूकलो असतो मी

तुझ्या मैत्रीणे तारले असे... नाहीतर
वादळात या जीवनाच्या हूकलो असतो मी

खुलणार्‍या होत्याच बागा खुप जरी
मैत्रीवीणा तुझ्या ...निवडुंग सुकलो असतो मी

नशिबाचे फ़ासेच सारे खेळ खेळुन गेले
मृत्युसमोरही क्षणभर तुजसाठी झूकलो असतो मी
--संदीप सुरळे