माझ्या मैत्रीणीसाठी.......रानफ़ूल
उष:काळी भैरवीसवे
खुलणे तुझे
वेड्या वार्यासवे
होऊन वेडे डुलणे तुझे
तू एकटीच जरी
माळरानी डौलात डौलात
माळरानही ते भकास
तवसवे आले भरात भरात
तू रानवेडे रानफ़ूल
तुझ्या मस्तित तू खूल
काय भुंग्यांची दशा
तू वादळालाही देतसे हूल
--मीत्र