तुझ्या मैत्रीस जर मूकलो असतो मी
वाट आयुष्याची चूकलो असतो मी
तुझ्या मैत्रीणे तारले असे... नाहीतर
वादळात या जीवनाच्या हूकलो असतो मी
खुलणार्या होत्याच बागा खुप जरी
मैत्रीवीणा तुझ्या ...निवडुंग सुकलो असतो मी
नशिबाचे फ़ासेच सारे खेळ खेळुन गेले
मृत्युसमोरही क्षणभर तुजसाठी झूकलो असतो मी
--संदीप सुरळे
आठवणी
आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात
प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो
जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो
आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्या
माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी

....
संदीप सुरळे
तुझी मैत्री....
तुझ्या माझ्यात प्रेम आहे
मित्र मैत्रीणीचं
जगाला सांगितलं ओरडुन
अजुन काय करायचं
तुझी मैत्री मी
अजुन जपतो
जग मला म्हणत असतं
तुझ्यात मी प्रेयसी बघतो
तुझ्यावीना मैत्रीचं विश्व
थोडं अधुरं वाटतं
तुझ्याचमुळे मैत्रीचं नातं
खरं खुरं वाटतं
खरं सांगतो आज तुला
तू नाहीयेस जरी साथ
तुझ्यावीनाही जाणवतो मला
खांद्यावर तुझ्या मैत्रीचा हात
कधि तू रडताना
डोळ्यांत माझ्या आसवं दाटायची
माझ्यासाठी नाही ढळला माझा अश्रु कधी
तुझ्यासाठी डोळ्यांत त्यांची गर्दी वाटायची
तुझी माझी मैत्री
नितळ निखळ झर्यासारखी
गंध तिचा पसरते
अन चालते फ़क्त मैत्रीसारखी
तुझी माझी मैत्री अशी
अल्लड्शा मुलासारखी
जगाला विसरून खुलणार्या
हळुवार फ़ुलासारखी
तुझ्याशीवाय या जगात
आपली मैत्री जपतो आहे
तू नाहीस जरी
माझ्या शब्दात तुला बघतो आहे

Subscribe to:
Posts (Atom)