माझ्या मैत्रीणीसाठी.......रानफ़ूल
उष:काळी भैरवीसवे
खुलणे तुझे
वेड्या वार्यासवे
होऊन वेडे डुलणे तुझे
तू एकटीच जरी
माळरानी डौलात डौलात
माळरानही ते भकास
तवसवे आले भरात भरात
तू रानवेडे रानफ़ूल
तुझ्या मस्तित तू खूल
काय भुंग्यांची दशा
तू वादळालाही देतसे हूल
--मीत्र
बरा तुझा आधार भेटला
तुझ्या आसवांना जरा
तू ढळु दे गं आता
वाट नेहमीची तुझी
थोडी वळु दे गं आता
तुझ्या डोळयात गं माया
तुझ्या शब्दात गं छाया
तुझे सोबत गं असणे
होई दु:ख विसराया
वाटेचेही माझ्या
या चुकुन चुकणे
अंधार दाटतो अन
तुझे तार्यासम लुकलुकणे
अंधार गं पुन्हा
बघं दाटला दाटला
पुन्हा कधी गं वाटेल,
" बरा तुझा आधार भेटला "
--शब्द्सखा
तू ढळु दे गं आता
वाट नेहमीची तुझी
थोडी वळु दे गं आता
तुझ्या डोळयात गं माया
तुझ्या शब्दात गं छाया
तुझे सोबत गं असणे
होई दु:ख विसराया
वाटेचेही माझ्या
या चुकुन चुकणे
अंधार दाटतो अन
तुझे तार्यासम लुकलुकणे
अंधार गं पुन्हा
बघं दाटला दाटला
पुन्हा कधी गं वाटेल,
" बरा तुझा आधार भेटला "
--शब्द्सखा
....
संदीप सुरळे
Happy Birthday Shraddha!
प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
....
संदीप सुरळे
Subscribe to:
Posts (Atom)